का कुणास ठाऊक मला माझ्या आईसारखं बनता येणार नाही,
तिच्या सारखं स्वतःला बाजूला सारून
आपल्या कुटुंबाला महत्व देणं मला जमणार नाही,
कधी स्वतःचा विचार करत नाही,
कधी स्वतःला वेळ, महत्त्व देत नाही
का कुणास ठाऊक मला माझ्या आईसारखं बनता येणार नाही...
ती नेहमी इतक्या लवकर उठून
स्वतःच्या संसाराचा गाडा घेऊन चालते
भले तिच्या जोडीला वडिलांची साथ असो नसो
ती खंबीरपणे उभी राहून चालते
का कुणास ठाऊक मला माझ्या आईसारखं बनता येणार नाही...
