आज अचानक पप्पा सकाळी बोलता बोलता सहजच बोलून गेले

की ही वस्तू माझ्या पैशांची आहे

त्यावर मला सेकंदातच वाटले की

आई तू पण तुझ्या स्वतःवर लक्ष द्यायला हवं होतं

तू तुझ्या संसाराचा गाडा सांभाळता-सांभाळता स्वतःला जणू

विसरून गेली

तू स्वतःच जगणच विसरली

तुला कधी आठवत का कोणत्या दिवशी तु तुझ्या मना सारखं जगली

आई खूप राहिलं गं जगायचं तुझ्या स्वतःसाठी,

का कोणास ठाऊक मला माझ्या आईसारखं बनता येणार नाही....