एक मैत्रिण असावी, अस मला जेव्हा वाटलं ....
तेव्हा तू मला दिसलीस, मला जशी हवी होती .....
अगदी तशीच तू मला भेटलीस....
आठवणी त्याही उलगडाव्या आज....
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण लिहावा आज...
तिला काहीही बोललं, तरी ती ऐकणारी....
मला अजूनही आठवत नाही,
ती कधी रुसलेली....
एवढी कशी समजूतदार ती,
कधीही माझ्याशी न भांडणारी....
तिच्याविषयी बोलावं कितीतरी वेळ अजून ....
तिच्याविषयी सांगावं कितीतरी वेळ अजून ....
खूप काही लिहावेसे वाटते तिच्याविषयी आज....
पण थोडक्यात...
एक मैत्रीण असावी फक्त तिच्यासारखी..


