“पाऊल – वाट”

मित्रा,

वाट कधीच चुकत नसते , चुकतात ती आपली पाऊले

कधी सरळमार्गी , तर कधी वळ्णावर्ती ll

 

मित्रा ,

अशाच एका वाटेवर्ती 

निशिगंध फुलतो वळ्णावर्ती , अन मोगरा बहरतो त्या चकव्या चौकावर्ती ll

 

मित्रा,

त्यात काय एवढं वाटून घ्यायचं , पाऊले थकतील

पण अंतर काही न संपणारे, जितकं मोजू तितकं उरणारे ll

 

मित्रा , 

वाटांचा हिशोब तो कुठला

पुढच्या काय सापडत नाहीत , अन मागच्या काय गवसत नाहीत ll

 

मित्रा , 

मेळ त्या पाउलांचा एक पुढे, तर एक मागे

तेव्हांकुठे सरते एक पाऊलवाट ती , अन जीवनात उरते ती ओळख नुसती ll

 

मित्रा,

क्रॉसिंग  नको  म्हणून पकडल्या समांतर  वाटा ह्या  

नशिबाला दोष  देत, आता छेदून झाल्या त्या निसरड्या ह्या ll

 

मित्रा ,

या वाटांचे एक बरे असते ,

सुख दुःखांच्या पाऊलांचे ओझं त्या झेलण्यासाठी   

अन सगळ्यांनाच खुणावतात, ते हि भग्न स्वप्नांच्या एका क्षणासाठी ll

 

मित्रा ,

इशाऱ्यांनी भुलवी या वाटा नवंनव्या

काही माझ्यासाठी ,

काही तुझ्यासाठी ...

तर काही सर्वांसाठी ...!!

बघ , आता तूच या वाटा आता कोणत्या क्षितीजेला 

अन पाऊले हि कोणत्या दिशेला ?