युध्दं नको बुद्ध हवा 

कितीदा सांगावं ओरडून

मानवजातीचा कलंक हा

बाबांनो कधी घेणार समजून ?

 

म्हणतात ना माणूस हुशार सर्वाहून

का मग पुन्हा पुन्हा मातीच खातो

पैसे सत्ता खुर्ची टिकवण्यासाठी लढतो

मरतो- धडपडतो वेळी -अवेळी

 

युद्धाने केवळ दिला पश्चाताप द्वेष

रक्तामांसाचा खच ,निराशा आणि विध्वंश

बुद्धाने दिली कसे जगावे आचारसंहिता

आनंदी सुकर जगण्याचा मूलमंत्र खरा

 

संत - महंत ,सुधारक सारे थकून गेले

राजे रजवाडे लयास गेले, काय त्यांचा गुन्हा 

सैनिक पहारेदार, कुटुंबेच कुटुंबे निराधार

इतिहासाची पुनुरावृत्ती का मग पुनः पुन्हा ?

 

क्रांतीची भाषा प्रेमाची असावी सर्वकंष

हे विश्वची माझे घर ,एकमेका साह्य करू

कशास हवे युद्ध विनाशकारी निरंतर

प्रेम द्यावे घ्यावे किर्तीरुपी उरावे जग सोडताना