गच्चं आभाळ भरून आलंय
कंठात दाटला प्राण जसा
हरवल्या कुठे त्या दाहीदिशा
पदरी आली दुर्गती ,घोरनिराशा
नियतीचा खेळ म्हणावा की अपयश
की केवळ वास्तविक संघर्षमय वारसा ?
कुठे चुकलो आपण ,की भोवला अट्टहासही
शोधूनि थकलो उत्तर ,चल जाऊ दे लढू पुन्हा
Read More! Earn More! Learn More!