तूच माझी प्रीत सखी
सूर ताल अन लयही
तूच विराणी , प्रेमकथा
अन तू नसण्याचं भयही ...
तूच माझी व्यथा वेदना
तुजविण मी अधुरा ग
तूच माझी ग चित्रकथेतील
प्रेयसी ,मैत्रीण ,सर्वकाही
तूच जगण्याचा बहाणा
सुंदर संस्कृती कलाकृती
तू प्रेमळ ,सालस भावभिनी
अंत्य मध्य अन आरंभही ...
तूच आशा -निराशा ,वैशाख वणवा
असह्य अनाकलनीय कहर तू
पानझड अन वसंताचा बहर तू
नवचेतना जागवण्यास तन मना
