कळेचना मजला हे कसले प्रेम
निस्वार्थ निरागस अनाकलनीय
कुणी सांगावं एकतर्फी असावं बहुदा
तीच वोढ जुनीच खोड पुन्हा नव्याने
इतकी वर्ष झालीय आता त्या घटनेला
पण अगदी कालपरवा घडल्यागत
ताजीतवानी का मग वाटते आजही
तस तुझं प्रेम होत नव्हतं एक कोडंच
पण आजही तेच आकर्षण तुजविषयीची
ओढ प्रेम जिज्ञासा तसूभरही कामे होत नाही
तासंन तास बघत बसावं वाटत तसबिरीकडं
याला वेड म्हणावं कीमनाची न मोडणारी खोड
तुला माझ्याविषयी काय वाटतं तूच जाणे
पण का कुणास ठाऊक तुला भेटावसं वाटतं
भरभरून बोलावसं वाटतं तू कायम तिरस्कार
केलास, हेटाळणी केलीस वेळोवेळी तरीही
कळेचना हे कसलं प्रेम भरकटलेल बिनबुडाच
म्हणतात ना प्रेमात नी युद्धात सर्वकाही क्षम्य
मान्य परंतु जे पेरलं तेच उगवतं तो नियम ?
का इथे फुजुल ठरतो बुद्धीचा भावनेवर विजय
अन मी सपशेल फेल ,तू कायमच अपराजित
तस पाहिलं तर तू कायमच माझा तिरस्कार केलाय
अपमान अवहेलना मित्राकडून सहन करावं गपगुमान
आणि तरीही तुजविषयी तेच प्रेम तीच ओढ नव्य जोमाने
का आणि कसं हे प्रेम एककल्ली अनाकलनीय हवंहवंसं
