देवा आधी तुला मानतो कारण ...'s image
420K

देवा आधी तुला मानतो कारण ...

देवा आधी तुला मानतो कारण ...

देव असतो कमरेवरु हात ठेवून तटस्थ

तू घरी -दारी अंगणातही राबतेस रात्रंदिनी

तो भासतो कधी कपोलकल्पित तू त्यूहूनि वेगळी

 

देवा आधी तुला मानतो कारण ...

तो परीक्षा पाहतो म्हणतात भक्तांची

तू जळतेस वात बनून कुटुंबासाठी

मायेची माउली संचाची सावली अमुची

 

देवा आधी तुला मानतो कारण ...

तू असतेस छत्रछाया माझ्यासाठी 

तो पावतो न पावतो देव जाणे

तू मात्र सदैव तत्पर प्रेमापोटी

 

 

Read More! Earn More! Learn More!