कुणाची नजर लागली बरे 

या प्रेमाच्या नंदनवनास 

आनंदी पापभिरू जगाला 

का ग्रासले पोटभरू सत्तेने 

 


देणार कुणी उत्तर या या 

माथेफिरू अरेरावीला 

की की बघत बसणार  

केवळ तमाशा अन्याय होताना 


बळी तो कां पिळी खरे असले तरी 

कुठे हरवलीय मानवता ,संवेदना 

स्वार्थासाठी माणूस इतका लाचार 

मतलबी आणि मुर्दाड झालाय कोण जाणे 


विकसित झालेल्या देशांनी इतरांना 

छळावं राष्ट्र संघ हताश बघ्याच्या भूमिकेत 

सगळं काही अनाकलनीय ,अनैतिकच 

आज वेळ त्यांच्यावर उद्या आपल्यावर नाही कशावरून  


नेते संधीसाधू , भ्रष्ट मुजोर प्रशासक वर्ग  

अनआपल्या हक्काबाबत उदासीन जनता 

त्यांच्या पापात सहभागी गोदी मीडिया 

लाचार बेकार ,हताश दिशाहीन तरुणाई 


विकासाच्या नावाखाली जग कुठे पोहचले 

माणूसच माणसाच्या रक्ताचा भुकेला अन 

विज्ञानाच्या वारूवर स्वर होऊन स्वतःचाच 

घात करून घेतोय निर्लज्जपणे बिनधास्त अविरत