दगडापेक्षा वीट मऊ ...'s image
Poetry2 min read

दगडापेक्षा वीट मऊ ...

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 10, 2022
Share0 Bookmarks 62763 Reads0 Likes

यांच्यातले चोर त्यांच्यात गेले काय

अन त्यांच्यातले यांच्यात आले काय

जनता नेहमीच त्रस्त हताश हवालदील

म्हणतात ना दगडापेक्षा वीट मऊ ...

 

ठरलय प्रमाणे जो - तो आपलेच खरे करतो अन

बाकी सारे मूर्ख फक्त आपणच शहाणे म्हणतो

जात धर्म प्रदेश वर्गसंघर्षांतच धन्यता मानतो

अन निवडणुकीपुरता राजा पोळ्याचा बैल होतो

 

श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंतच होतो अन 

गरीब मात्र गुलामासारखा झिजून- झिजून मारतो

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts