चला गड्यानो ! प्रेमाच्या गावी
ना भांडता प्रेमाने राहू तिथे
हक्क्काने बांधू माणुसकीची घरे
त्याला असतील विश्वासाची दारे
चला गड्यानो ! विसरू सारे हेवेदावे
नकोच आता ती सारी व्यर्थ भ्रमंती
पुन्हा नव्याने एक होऊ चला
मिळुनी सारे प्रेमात न्हाऊ आनंदाने
चला गड्यानो ! गतकाळातील चूका सुधारू
कुणी सांगावं उद्या आपण असेंन - नसेन
पण यापुढेही सखाने नांदतील चारपिढ्या
मोठ्या मनाने आभार मानू सर्वांचे ...
चला गड्यानो ! सुगंधी फुलांना माळुया
बेशरम नी धोतऱ्याच्या फुलांना टाळूया
प्रेमाचा गाव प्रेमाने वसवू थोडासा विसावा
अंती मिळेल थकल्या -भागल्या जीवाला
