बायको- बायको थोडीशी सायको
थोडीसी हळवी ,भांडखोर जराशी
तोंडाचा पट्टा , पोट्ट्यानां रट्टा
झाडलोट ,रांधा वाढ उष्ट काढा
बायको- बायको थोडीशी हट्टी
लांबलचक भाषण ,कुकरची शिट्टी
तीच आई तीच शाळेतली बाई अन
विराणी जीवनसंगीत अन गीत अंगाई
बायको- बायको थोडीशी मायावी
असून अडचण नसून खोळंबा
जणू अवघड ठिकाणचं दुखणं
सांगतही येईना अन सहनही होईना
बायको- बायको रोती हो कायको
माझ सारं तुझंच गडे, तुझ तुला लखलाभ
चालू असत तुझं सदा ऐकलं का ... अहो ...
विचारावं तुला त्याशिवाय मी दुसरं काही केलं का ?
बायको म्हणजे जगातलंआठवं आश्चर्य
गिनीजबुकातून सारेच थकले उपाय शोधून
तिजवीण घरदार अंगण सुने -सुने वाटते
असता घर दारी संसारी दरवळे सुगंधापरी भासते
