तू न मला कधी आपलं मानलं
मी ही तुला कधी प्रपोज केलं
मोघमच सर्वस्व वाहिलं तरीही...
स्वप्नातील राजकुमारी तू
मी प्रेमनगरातील नवखा प्यादा
अबोल प्रेम अधांतरी शेवटपर्यंत
तू सांगितले कधी मनातले
न मी विचारले तसले कधी
प्रेम जडले तुजवरी ...
मी न दिला गुलाब कधी
न तू कधी होता मागितला
एकतर्फी प्रेमाचा खेळ सारा
प्रेम काय असतं ज्ञात तुला
न मलाही अवगत होत तेंव्हा
मैत्री आकर्षण की केवळ की भास
असेल- नसेल प्रेम मजवरी
तुझे तुलाच माहीत गडे ते
प्रेमळ ,लोभसवाणे हवेहवेसे
एवढं मात्र खात्रीनं सांगावंस वाटतं
मी कधी विसरू शकलो न तुला
कदाचित तू मला विसरलीही असशील
