आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे
तुझ्याचसाठी धावपळ नुसती समजुन घे ना थोडे
जे काही असेल ते स्पष्टच रे कशास हवे लाख बहाणे ?
टीचभर पोटासाठी बघतेस ना तू ही गडे खरे खोटे
आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे
मान्य परंतु करणार काय तूच सांग गडे ?
केवढी धावपळ टेन्शन वरतून ही महागाई
मौन म्हणजे परीस ग ,मीही माणूसच ना, न की सांगाडे
आजकाल तुला भेटणे दुरापास्त झाले आहे
कधी नसतो काही मी टाळतो वाद होऊ नये म्हणून
<Read More! Earn More! Learn More!