आई तुळजाभवानीच्या
हर हर महादेव गजरात
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात
छत्रपती शिवाजीराजे भेटतात
हिंदुस्थानाच्या दाही दिशात
सह्याद्रीच्या दुर्ग दऱ्या डोंगरात
क्रांतीच्या स्वतंत्र विचारात
छत्रपती शिवाजीराजे भेटतात
असंख्य हृदयांच्या प्रत्येक ठोक्यात
जगातील गौरवात नेहमी,
बहुजनांच्या डोळ्यात
छत्रपती शिवाजीराजे भेटतात
राष्ट्रभक्त चरित्रात अन्यायाविरुद्ध बंडात
परोपकारात आईच्या वात्सल्यात
क्षणो क्षणी समाजकार्यात
मंदिरातल्या प्रत्येक दिव्यात
छत्रपती शिवाजीराजे भेटतात
©विनोद बाबाराव गणेशपुरे


